Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

बालाजी माहात्म्य - भाग ४

आकाशराजाचे चरित्र

पांडवानंतर चद्रवंशराजा परिक्षिताच्या पासून कलियुगाचा आरंभ होतो.
चंद्रवंशराजा सुधर्म चोलदेशात राज्य करीत होता. त्याची प्रजा खूप सुखी होती. एकदा शिकार करण्याकरीता वेंकटगिरीच्या जवळपास राजा आपल्या सेनेपासून खूप दूर येऊन पोहोचला. तो कपिलतीर्था जवळ आला. व तेथेच जवळ असलेल्या एका झाडाच्या छायेत आराम करित असता त्याला एक अदभुत दृश्य दिसले.
एक नागिण बिळातून बाहेर आली व तीने आपले रुप बदलून टाकून एक अत्यंत सुंदर अश्या अप्सरेत रुपांतर करुन घेतले. आणि जवळच असलेल्या तलावात पोहोण्यास उतरली ते सर्व राजा सुधर्मनी पाहिले व तिच्यावर मोहीत होऊन तो तिच्याकडे जावू लागला. ती जेव्हां कपडे बदलण्याकरीता बाहेर पडू लागली तेव्हां तो तिच्याजवळ जावून अत्यंत प्रेमाने तिची विचारपूस करु लागला:- “ हे देवते ! तु कोण आहेस? तुझे नाव काय? तुझी जन्मकहाणी मला सांग तुला बोलता येते ना?
राजाचे सौंदर्य पाहून लाजेनी अर्धमेली झालेली नागराजकुमारी हळु आवाजात बोलली “ मी नागराजकन्या आहे. माझे घर नागलोकात आहे. सुधर्म म्हणाला “ मी चोल देशाचा राजा आहे. माझे नाव सुधर्म. ” मी तुझ्याशी गान्धर्व विवाह करु इच्छित आहे. परंतु नागकन्येने अट घातली मला होणार्‍या मुलाला चोलराज्य मिळाले पाहिजे ते राजाने कबुल केले व तिच्याशी विवाह केला व आपल्या राज्यात परत आला.
ह्याच सुमारास राजाच्या पहिल्या राणीला सुद्धा एक मुलगा झाला. व नागकन्येला पण एक मुलगा झाला. आता राजा संकटात पडला मुलाचे नामकरण झाल्यावर तो नागलोकात गेला.
नागकन्येने त्यांना आठवण करुन दिली की, तिच्याच मुलाला राज्य मिळाले पाहिजे परंतु राजाने सांगीतले की, मोठा मुलगा असतांना लहान मुलाला राज्य कसे देता येणार तरीही सर्व प्रधान मंत्री प्रजा हे कोणीही मानणार नाहीत. हे ऐकून नागकन्या अतिशय दुःखी झाली व मुलाच्या जिवन मरणांचा विचार न करता तिने एका लाकडी पेटीत मुलाला ठेवून ती पेटी नदीच्या प्रवाहात सोडून दिली.
मुलासह लाकडीपेटी वहात एका कोळ्याला मिळाली त्याने ती सुंदर लहान मूल असलेली पेटी आश्चर्य करीत राजाला अर्पण केली. राजांनी आपल्या मुलाला ओळखले व त्यांचा स्वीकार करुन नागलोकात जाऊन नागकन्येकडे पोहोंचते केले व तीला तिच्या मुलाला वयात येताच अर्धे राज्य देण्याचे कबुल केले.
जसा जसा मुलगा मोठा होवू लागला तसे त्याला सर्व विद्या गुण प्राप्त झाले. व योग्यवेळी त्याला राजा सुधर्मकडे पाठवून दिले. सुधर्म राजाच्या मोठ्या मुलाचे नाव आकाशराजा व दुसर्‍या नागकन्येच्या मुलाचे नाव तोंडमान दोन्ही भाऊ परस्परांवर प्रेम करीत असत. दोघेही राज्यकारभार पहात. परंतु बरेच वर्षे आकाशराजा दुःखीत होता त्याला मुलबाळ काहीच झाले नाही.
पद्मावतीदेवीचा जन्म
एके दिवशी आकाश राजानी आपली दुःखभरी कराणी कुलगुरु बृहस्पतीला सांगितली तेम्हणाले “ हे गुरुदेवा ! माझ्या जिविताला सर्व सुखे आहेत. परंतु मुलबाळ नसल्यान मी अत्यंत दुःखीत आहे. तरी काही उपाय असल्यास सांग बृहस्पतीनी सर्व एकून घेऊन राजाला लवकरच मुल होईल अशी आज्ञा दिली व राजाला पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्यास सांगीतला.
आकाशराजानी यज्ञाची सर्व तयारी केली. व शुभमुहूर्तावर आरंभ केला. आकाशराजा आरणी नदीच्या काठी सोन्याच्या नागराने जमीन नागंरुन पेरीत असतांना त्यानी एक पेटी लागली पेटी उघडताच आंत सर्व सुलक्षणसंपन्न जणु सोन्याचीच पुतळी अशी एक अति लावण्यवती मुलगी कमळाच्या शय्येवर पहुडलेली आढळून आली. त्या मुलीला पाहिल्या बरोबर ही मुलगी माझी आहे असे तो आनंदाने म्हणू लागला. व तेव्हांच आकाशवाणी झाली. अत्यानंद झालेल्या आकाश राजाने आता आपल्या सुलोचनेचे पालन पोषण करावे असे सांगण्यात आले. त्रेतायुगात जशी जनकराजाला जमिनीतुन जानकी मिळाली तशी कलीयुगात आकाशराजाला पद्मावती मिळाली. आकाशराजाने प्रसन्न मनाने आपल्या महालात प्रवेश केला व राणी धरणीदेवीला म्हणाला पृथ्वीच्या पोटातून जन्मलेल्या या माझ्या कन्येकडे पहा. आपणांस संतान नव्हते ना. आता हिच आपली मुलगी असे म्हणुन आकाशराजाने धरणीदेवीच्या हातात ती मुलगी दिली. ती मुलगी कमळापासून उत्पन्न झाल्यामुळे तिचे नांव पद्मावती ठेवण्यात आले. नंतर राजाचा यज्ञपण पूर्ण झाला त्यानतर दहा महीन्यांनी धरणीदेवाने एका पुत्ररत्नास जन्म दिला. त्यांचे नांव वसुदान ठेवण्यात आले. दोन्ही मुलांचा धरणीदेवी संभाळ करु लागली. पद्मावती हळु हळु वयात आली व राजाला चिन्ता लागुन राहीली की तिच्या योग्य पति कसा हुडकावा.
नारादाचा प्रवेश
सर्व देवदेवतांना माहित होते की. लक्ष्मी हिच पद्मावतीचे रुप घेऊन आली आहे. ही गोष्ट पद्मावतीच्या कानावर घालण्याकरीता नारद तिच्याकडे आला. नारदानी एका म्हतार्‍याचे रुप घेतले व तो जेथे पद्मावती आपल्या सखी बरोबर उद्यानांत बसली होती तेथे आला पद्मावती नारदाला पाहून त्यांना बसायला सांगुन त्याला दूध फळ वगैरे देऊन त्याचे आगत्य करु लागली. तेव्हां नारदांनी विचारले हे देवी तू कोण आहेस? तू कोणाची मुलगी आहेस? तू दिसायला तर साक्षात लक्ष्मी वाटतेस. तुझां हांत दांखव मी तुझे भविष्यव वर्तमांन सांगतो. पद्मावतीचा हात पाहिल्या बरोबर नारद बोलला “ खरेच ! मी जे गृहित धरले तेच खरे ठरले तूच लक्ष्मी आहेस. तुझ्याशी लग्नाची मागणी घालण्याकरीता विष्णु स्वतः इकडे येत आहेत. लवकरच ते इथे पोहोचतील.
पद्मावती लाजून म्हणाली तुम्ही माझी. थट्टा करीत आहात. आणि काही नाही.
नारदांनी सांगीतले पहा खोटे वाटत असेल तर थोड्याच दिवसात एका घोड्यावर बसुन प्रत्यक्ष श्री महाविष्णु इथे तुझ्या शोर्धाथ येतील असे सांगुन नारद निघुन गेले.
पद्मावती व श्रीनिवास यांची भेट
एक दिवस श्रीनिवास जंगलात शिकार करण्याकरीता गेले. परंतु त्यांना कोणतीच शिकार मिळाली नाही. तेव्हां भटकत असतांना त्यांना एक हरण दिसले. त्याचा पाठलाग करीत श्रीनिवास जेथे पद्मावती व तिच्या सखी वनविहार करीत होत्या तेथे आले परंतु पद्मावतीच्या मागे हत्ती जात असल्याचे दृष्टोत्पतीस पडले. तेव्हां त्या सर्वजणी घाबरुन गेल्या तेवढ्यांत स्वरुपसुंदर असा देखणा पुरुष उंच व उमद्या घोड्यावर आरुढ होऊन एका हरिणाचा वेगाने पाठलाग करीत येत असल्याचे दिसले व त्या घोडेस्वाराला पहाताच हत्तीने चित्कार केला व आपली सोंड हलवीत निघुन गेला.
थोड्या वेळाने पाठोपाठ श्रीनिवास त्यांना सामोरा गेला. पद्मावती व तिच्या सखीनी त्याला पहाताच त्याचे भान हरपून गेले. पद्मावती श्रीनिवासला पहातच राहीली. व हा श्यामलकाती सुंदर असा कोण आहे. म्हणुन विचार करीत राहिली.
श्रीनिवास त्यांच्या जवळजाऊन विचारुन लागला हे रुप सुंदर तरुणी तु कोण आहेस. असे सौंदर्य आतापर्यंत मी पाहिलेले नाही. तु या भूलोकांत रहणारीच आहेस कां?
पुर्वी कधीही पाहिले नाही अश्या या परपुरुषाला पाहून पद्मावती व तिच्या सखी आश्चर्यचकित झाल्या व त्यांना विचारु लागला की आपण देखील कोण आहात? कोठून आलात ही मुलगी अशीतशी कोणी नाही ही आकाशराजाची मुलगी पद्मावती आहे. व आम्ही तिच्या मैत्रिणी आहोत. तुम्ही परवानगिशिवाय आंत आलात हे जर कां आकाश राजाला कळले तर तुमची काही खैर नाही.
तेव्हां श्रीनिवासानी आपली कथा सांगीतली माझा जन्म सूर्यवंशात झालेला असुन माझी अनेक नांवे आहेत. वसुदेव नावाच्या राजाचा मी मुलगा आहे माझे नांव कृष्ण आहे. माझा मोठा भाऊ बलराम आहे. माझी आई देवकी. माझे अजुन लग्न झाले नाही. ते एकून सर्व मैत्रिणी त्याला म्हणाल्या तुम्ही तुमच्या राज्यात निघुन जा.
श्रीनिवास त्यांना पाहून म्हणाले: ह्या सुंदरीवर माझे मन बसले आहे. आम्ही सर्वगुण संपन्न दोघेही असल्या कारणाने मी तिच्याशी लग्न करु इच्छीत आहे. जर तिला मी पसंत असेन तर ती मला लवकरच प्राप्त व्हावी अशी इच्छा करतो.
त्याचे हे बोलणे ऐकल्याबरोबर तिच्या सर्वसखी क्रोधायमान झाल्या. त्याला आलात तसे चालू लागा. सांगून त्याला खूप बोलू लागल्या व हातात दगड घेऊन मारायला घावल्या त्या मुलींचा क्रोध पाहून व त्याचे संतापक्त भाषण ऐकून तो श्रीनिवास अश्वरुढ होऊन पर्वतावर निमूटपणे निघुन गेला.
बकुलादेवीला काळजी
बर्‍याच वर्षापासून वारुळांतच बसलेल्या श्रीनिवासाना अरण्यात शिकारीला जातांना पाहून बकुलादेवीला आनंद झाला परंतु शिकारीहून परत आल्यावर त्यांचे उदास रहाणे पाहून परत तिला चिंता वाटू लागली.
तिने विचारले:- मुला तूला कोणी दुःखीत केले. तु इतक्या लवकर घरी परत कसा काय आलास मी तुला खायाला पंचपक्वान्ने घेऊन आले आहे. तरी उठा व भोजना करीता या. तेव्हां श्रीनिवासानी जे जे झाले ते ते सांगायला सुरुवात केली.
आईने विचारले- मुला तु शिकारिला गेला तेव्हां तेथे असे काय झाले की. जिच्या दर्शनामुळ आपण कार्मात झाल्यासारखे दिसता.
मुलगा:- मी एका हरणाला पाहिले ते अतिशय सुंदर होते.
आई:- मग हरणानीच तुझी अशी अवस्था केली कां त्यांनच धोका दिला असे वाटते.
मुलगा:- हे आई तिनेंच माझे मन हिरावून घेतले आणि परत नाहिशी झाली.
आई:- तुझी अशी अवस्था व्हायला कारण तिने खूप घोर तपस्या केला असणार नाहीतर तुझ्या सारख्या लोकरक्षण करणायाचे मन तितक्या लवकर परावृत्त करता येणार नाही.
मुलगा:- हो ! नाहीतर मी तिचा ऋणी होणार नाही तिने तपश्चर्या खूप केली आहे त्याशिवाय त्यागपण केला आहे.
आई:- “ असे? मला खूप आश्चर्य वाटते आहे. ”
ते हरीण कोणाचे होते श्रीनिवास मला सर्व कथा सविस्तर सांग.