Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

बालाजी माहात्म्य - भाग १

श्री व्यंकटेश पुराण

श्री व्यंकटेश पुराण नावाचे वेगळे असे दुसरे पुराण नाही. श्री व्यंकटेश्वर स्वामीची महानता व प्रसिद्धी अनेक कथांमध्ये वर्णिली आहे. ब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आहे.
रोज हजारों भक्तलौक भारताच्या कानाकोपर्‍यांतून येथे आकर्षित होतात. श्री व्यंकटशाची महती माहीत नसणारा म्हणजे दुर्मिळच स्वतः व्यंकटेशच भक्तलोकांना आपले दर्शन देतो व भक्तां बरोबर बोलत हसत खेळत असताया दिसतो. त्यांच्या आशा व आकांक्षा इच्छा पूर्ण करतो. भारताच्या कानकोपर्‍यातून अनेक अडचणीनां तोंड देऊन भक्तलोक कसेही कुठूनही तिरुपतिला श्री बालाजीच्या दर्शनाला नेहमी येतच असतात.
( विस्तृत माहितीसाठी भक्त विजय आपण वाचावे )
यास्तव आपण व्यंकटेश महात्म्य वाचतो. जे वाचतात ते समजूनच घेतात. दूसर्‍यांना सांगतात व स्मरण करतात. करवतात. थोडक्यात श्री व्यंकटेशाचे श्रवण स्मरण केल्याने पुण्य फलप्राप्ति होते. ह्यासाठीच आम्ही ही छोटीशी कथारुपी पुस्तिका आपल्या हातात समर्पण करीत आहोत.
तिरुपति महात्म्य
श्री बालाजीचे मुळस्थान तिरुपति पर्वत आहे. त्याची महती अनेक आख्यायिका, निरनिराळ्या प्रकारे झालेली आहेच ब्रह्माण्ड पुराण मध्ये ह्याचे चरित्र जे नारदाकडून ऋषीमुनीनां कळले त्याचेच संक्षिप्त वर्णन येथे दिलेले आहे.