Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

किर्र रात्री सुन्न रात्र...

किर्र रात्री सुन्न रात्री

झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती,

दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपो-आप खोले !

आली आली भुताबाई;

तीन माणसे रोज खाई

स्मशानामध्ये घालते फेरी

पहाटेपूर्वी करते न्हेरी

न्हेरीसाठी होतात चट्‍ट

दोन पोरे लठ्‍ठ मठ्‍ठ

पण प्रत्येक एकादशीस

रताळ्याचा खाते कीस.

किर्र रात्री सुन्न रानी

झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती

दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपोआप खोले !

आला आला महासमंध;

त्याची चाल संथ संथ

त्याची उंची दहा फूट

अंगावरती काळा सूट,

डोक्यावरती हँट बीट,

तुम्ही फसाल ! पहा नीट

वळवळणारे गळ्यात काय ?

नागोबाचा लंबा टाय !

किर्र रात्री सुन्न रानी

झर्र वारा भुर्र पानी ;

शार वाडा गार भिंती,

दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपोआप खोले !

आले आले थातूमातू ;

खाते सातू जर सातू

नसले घरात तर बसते

नखे खात. रोज रात्री

मांजरावरुन हे येते

जग फिरुन, हे भूत

आहे मुत्रे, तरी त्याला

भितात कुत्रे.

किर्र रानी सुन्न रानी

झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती,

दार त्यांचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपो-आप खोले !

आले आले अरेतुरे ;

हे भूत काळेबेरे

मध्य रात्री रांगत येते;

दारावरती थाप देते.

जर त्याला घेतले घरात

जीभ काढते तेरा हात.

पण ’कारे’ म्हटले तर,

जाईल सोडून तुमचे घर.

किर्र रात्री सुन्न रानी

झर्र वारा भुर्र पानी ;

शार वाडा गार भिंती

दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपो-आप खोले !

आला आला आग्या वेताळ;

त्याच्या डोक्यात असतो जाळ.

कोळसे खातो कराकर;

राकेल पितो डबाभर.

डोक्यावरती कढई धरुन

भुते घेतात स्वैपाक करुन

केसामधून उठतात ज्वाळा,

सगळे न्हावी भितात त्याला.

किर्र रात्री सुन्न रानी;

झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती

दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपो-आप खोले !

आला आला पिंपळावरुन

एक मुंजा संध्या करुन.

त्याची पोथी चालत येते;

हळूच त्याच्या हातात जाते.

रक्‍तासारखी पाने लाल,

खुणेसाठी असते पाल.

तीच पोथी ऐकण्यासाठी

भुते आली; झाली दाटी

पाल लागली चुकचुक करु,

पोथीवाचन झाले सुरु;

’हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड

फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड’

किर्र रात्री सुन्न रानी

झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती

दार त्याचे हस्तिदंती.

सर्व आले सर्व आले

दार हसले बंद झाले !

बाल गीते - संग्रह १

संकलित
Chapters
सांग मला रे सांग मला आई...
आई व्हावी मुलगी माझी ,...
आईसारखे दैवत सा र्‍या ज...
आणायचा, माझ्या ताईला नवर...
रुसु बाई रुसु कोपर्‍यात ब...
आला आला पाउस आला बघ...
आली बघ गाई गाई शेजारच्या ...
आवडती भारी मला माझे आजोबा...
लहान सुद्धा महान असते ...
इवल्या इवल्या वाळूचं , ...
इवल्या इवल्याशा, टिकल्या-...
उगी उगी गे उगी आभाळ...
एक कोल्हा , बहु भुकेला ...
उठा उठा चिऊताई सारीक...
एक झोका चुके काळजाचा ठो...
एक होता काऊ , तो चिमणी...
एका तळ्यात होती बदके ...
कर आता गाई गाई तुला...
कशासाठी पोटासाठी खंडाळ्...
काडकीच्या टोकावर ताणलाय...
किलबिल किलबिल प क्षी बो...
कोण येणार ग पाहुणे ...
गमाडि गंमत जमाडि जंमत ...
गोड गोजरी , लाज लाजरी ...
चंदाराणी , चंदाराणी , का ...
चांदोबा चांदोबा भागलास ...
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छ...
ओळखणार ना बरोबर , ओळखा ...
झुक झुक झुक झुक अगीनग...
टप टप टप काय बाहेर व...
टप्‌ टप्‌ पडती अंगावरत...
टप टप टप टप टाकित टा...
टप टप टप थेंब वाजती ,...
ठाऊक नाही मज काही ! ...
ताईबाई , ताईबाई ग , अत...
तुझ्या गळा, माझ्या ग...
तुझी नी माझी गंमत वहि...
दिवसभर पावसात असून , सा...
देवा तुझे किती सुंदर ...
हासरा, नाचरा जरासा लाजर...
हिरवी झाडी , पिवळा डोंगर ...
करा रे हाकारा पिटा रे डां...
उन्हामध्ये पावसाला रुपडं ...
पिंपळगावी एक पोरगा मुलगा ...
गाढवापुढे कोडे एकदा पडले ...
किर्र रात्री सुन्न रात्र...
एक होता राजा आणि एक होती ...
कावळ्यांची शाळा रंग त्...
सरळ नाक , गोरी पान , लाल ...
झुंईऽऽ करीत विमान कसं ...
धाड् धाड् खाड् खाड् च...
खरं सांगू ? विदूषकच सर्व...
विदूषकाचे हे डोळे किती...
वाटी ठेविली चांदीची जेव्ह...
दाणेदार शुभ्र मीठ दिसतं क...