Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

स्वच्छतेचा वसा

गणपतचा खानावळीचा व्यवसाय अगदी जोरात सुरु होता पण काही दिवसांनी रमणने त्यांच्याच शेजारी नवी खानावळ सुरु केली आणि गणपतची खानावळ पार बसली. त्याला रोज ग्राहकांची वाट पाहावी लागे. एके दिवशी गणपतचा मित्र राम त्याच्याकडे आला तर गणपत एकदम निराश बसलेला दिसला. त्याने कारण विचारताच गणपतने त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यावर राम त्याला म्हणाला, अरे, काही सांगतो त्यावरुन तू लक्षात घे, तुझे काय चुकले ते. माझ्या ओळखीच्या एका तरुणाने अगदी सुंदर सुशिक्षित मुलगी नाकारली केवळ तिने विटलेली साडी नेसली होती आणि केस बांधले नव्हते या कारणामुळे. तू पण तीच चूक करतो आहेस, त्या मुलगीसारखा. तुझ्या खानावळीत जो चवीचा स्वयंपाक होतो तो रमणच्या खानावळीत होत नसला तरी त्याच्या खानावळीची स्वच्छता आणि टापटीप ग्राहकाला खेचत आहे. तू देखील बदल केलास तर तुझी खानावळ पुन्हा जोरात चालेल, यात शंका नाही. गणपतला आपली चूक उमगली.