Get it on Google Play
Download on the App Store

सुखदु:खाचे अनुभव 10

संसारात नाना दु:खे. परंतु त्यात पोटच्या बाळाचे मरण, त्या दु:खाला सीमाच नाही. आई मुलीला म्हणते :

पुरे हो रडणें             धीर ना सखी सांडी
शोभेल पुन्हा मांडी             तान्हेबाळानें ॥
नको नको रडूं             पुन्हा कळी ग फुलेल
पुन्हा पाळणी हलेल             तुझ्या घरीं ॥
आंबे मोहरती             सारे कोठें ग फळती
फळती तितुके ना पिकती         किती सांगू ॥

आजोळच्या कौतुकाचे वर्णन आहे. परंतु आई मुलाला म्हणते, “मामाकडे बोलाविल्याशिवाय जाऊ नये.”

मामाच्या रे घरा         नको जाऊं लडालडा
येऊं दे गाडी घोडा             गोपूबाळा ॥
मामाच्या रे घरा         नको जाऊ कामावीण
येऊं दे बोलावणं             गोपूबाळा ॥

गावातल्या गावात जर सासर-माहेर असेल तर मजा. लहानपणी लग्न झालेले असावे. मग त्या लहानशी बहिणीला आणण्यासाठी वासरांच्या गाडीने जात :

गांवातल्या गांवांत         उषाताईचे सासरे
गाडीला जुंपिलीं वांसरें             भाईरायांनीं ॥

कधी कधी भावजया भावजया भांडतात. ही भांडणे पुष्कळ वेळा लहान मुलांवरून असावयाची. त्या गोड बाळाला ती भांडणे समजतही नाहीत :

धाकटी वैनी मोठी वैनी         भांडती कडाकडा ॥
मध्ये साखरेचा खडा             गोपूबाळ ॥

गावात लग्ने असावीत. माहेरी आलेली नणंद वैनीस म्हणते :

लगीनसराई             कापडाची महागाई
नेस तूं ग वैनीबाई             पीतांबर ॥

अशा रीतीने वैनीला नणंदाबाई आनंदवितात. लेकी सुना घरात आल्या म्हणजे म्हातारबाईला कोण समाधान. ती म्हणते :

लेकी झाल्या लोकी         सुना झाल्या लेकी
हातींचे काम घेती             मायबाईच्या ॥

स्वत:च्या मुली परक्या झाल्या. परक्याच्या मुली सुना होऊन घरच्या सारख्या झाल्या. सासूबाईंना त्या आता काम करू देत नाहीत. भाग्याची म्हातारी आजीबाई आता नातवंडे खेळवते :

नातवंडे पतवंडे             भरली ओसरी
दैवाची बैसली                 आजीबाई ॥
नातवंडाची आजी         पंतवंडांना दूध पाजी
दैवाची आहे माझी             आजीबाई ॥

असे एकत्र कुटुंबपध्दतीतील हे वर्णन आहे, घर म्हणजे जसे गोकुळ. मुलांबाळांनी, लेकीसुनांनी गडीमाणसांनी गजबजलेले. भांडणे-तंडणे आहेत. परंतु त्यातही शेवटी संयम येऊन सारे पुन्हा गोड व्हायचे, समाधान मिळावयाचे, असो. आता तुम्ही प्रत्यक्षच त्या ओव्या वाचा.

स्त्रीजीवन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
बहिण-भाऊ 1 बहिण-भाऊ 2 बहिण-भाऊ 3 बहिण-भाऊ 4 बहिण-भाऊ 5 बहिण-भाऊ 6 बहिण-भाऊ 7 बहिण-भाऊ 8 बहिण-भाऊ 9 बहिण-भाऊ 10 बहिण-भाऊ 11 बहिण-भाऊ 12 बहिण-भाऊ 13 बहिण-भाऊ 14 बहिण-भाऊ 15 बहिण-भाऊ 16 बहिण-भाऊ 17 बहिण-भाऊ 18 बहिण-भाऊ 19 बहिण-भाऊ 20 बहिण-भाऊ 21 बहिण-भाऊ 22 बहिण-भाऊ 23 बहिण-भाऊ 24 बहिण-भाऊ 25 मायलेकरे 1 मायलेकरे 2 मायलेकरे 3 मायलेकरे 4 मायलेकरे 5 मायलेकरे 6 मायलेकरे 7 मायलेकरे 8 मायलेकरे 9 मायलेकरे 10 मायलेकरे 11 मायलेकरे 12 मायलेकरे 13 मायलेकरे 14 मायलेकरे 15 मायलेकरे 16 मायलेकरे 17 मायलेकरे 18 मायलेकरे 19 मायलेकरे 20 मायलेकरे 21 मायलेकरे 22 मायलेकरे 23 मायलेकरे 24 मायलेकरे 25 मायलेकरे 26 मायलेकरे 27 मायलेकरे 28 मायलेकरे 29 मायलेकरे 30 मायलेकरे 31 मायलेकरे 32 मायलेकरे 33 मायलेकरे 34 मायलेकरे 35 मायलेकरे 36 मायलेकरे 37 मायलेकरे 38 मायलेकरे 39 मुलगी 1 मुलगी 2 मुलगी 3 मुलगी 4 मुलगी 5 मुलगी 6 मुलगी 7 मुलगी 8 मुलगी 9 मुलगी 10 मुलगी 11 मुलगी 12 मुलगी 13 मुलगी 14 मुलगी 15 मुलगी 16 मुलगी 17 मुलगी 18 मुलगी 19 मुलगी 20 मुलगी 21 सुखदु:खाचे अनुभव 1 सुखदु:खाचे अनुभव 2 सुखदु:खाचे अनुभव 3 सुखदु:खाचे अनुभव 4 सुखदु:खाचे अनुभव 5 सुखदु:खाचे अनुभव 6 सुखदु:खाचे अनुभव 7 सुखदु:खाचे अनुभव 8 सुखदु:खाचे अनुभव 9 सुखदु:खाचे अनुभव 10 सुखदु:खाचे अनुभव 11 सुखदु:खाचे अनुभव 12 सुखदु:खाचे अनुभव 13 सुखदु:खाचे अनुभव 14 सुखदु:खाचे अनुभव 15 सुखदु:खाचे अनुभव 16 सुखदु:खाचे अनुभव 17 सुखदु:खाचे अनुभव 18 सुखदु:खाचे अनुभव 19 सुखदु:खाचे अनुभव 20 सुखदु:खाचे अनुभव 21 सुखदु:खाचे अनुभव 22 सुखदु:खाचे अनुभव 23 सुखदु:खाचे अनुभव 24 सुखदु:खाचे अनुभव 25 सुखदु:खाचे अनुभव 26 सुखदु:खाचे अनुभव 27 सुखदु:खाचे अनुभव 28 सुखदु:खाचे अनुभव 29 सुखदु:खाचे अनुभव 30 सुखदु:खाचे अनुभव 31 सुखदु:खाचे अनुभव 32 सुखदु:खाचे अनुभव 33 सुखदु:खाचे अनुभव 34 सुखदु:खाचे अनुभव 35 सुखदु:खाचे अनुभव 36 सुखदु:खाचे अनुभव 37 सुखदु:खाचे अनुभव 38 सुखदु:खाचे अनुभव 39 सुखदु:खाचे अनुभव 40 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 1 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 2 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 3 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 4 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 5 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 6 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 7 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 8 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 9 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 10 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 11 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 12 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 13 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 14 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 15 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 16 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 17 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 18 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 19 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 20 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 21 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 1 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 2 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 3 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 4 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 5 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 6 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 7 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 8 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 9 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 10 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 11 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 12 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 13 ऐतिहासिक व देशाच्या 1 ऐतिहासिक व देशाच्या 2 ऐतिहासिक व देशाच्या 3 ऐतिहासिक व देशाच्या 4 ऐतिहासिक व देशाच्या 5 ऐतिहासिक व देशाच्या 6 ऐतिहासिक व देशाच्या 7 ऐतिहासिक व देशाच्या 8 ऐतिहासिक व देशाच्या 9 ऐतिहासिक व देशाच्या 10 व्रते, सण वगैरे 1 व्रते, सण वगैरे 2 व्रते, सण वगैरे 3 व्रते, सण वगैरे 4 व्रते, सण वगैरे 5 व्रते, सण वगैरे 6 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 1 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 2 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 3 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 4 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 5 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 6 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 7 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 8 पहिली माझी ओवी 1 पहिली माझी ओवी 2 पहिली माझी ओवी 3 पहिली माझी ओवी 4 पहिली माझी ओवी 5 पहिली माझी ओवी 6 सुभाषिते 1 सुभाषिते 2 सुभाषिते 3 सुभाषिते 4 सुभाषिते 5 सुभाषिते 6 सुभाषिते 7 संकीर्ण 1 संकीर्ण 2 संकीर्ण 3 संकीर्ण 4 संकीर्ण 5 संकीर्ण 6 संकीर्ण 7 संकीर्ण 8 संकीर्ण 9 संकीर्ण 10 संकीर्ण 11 सुंदर पत्रे 31 भारतीय संस्कृती 52