Get it on Google Play
Download on the App Store

समाजधर्म 26

१० : प्रगती

''प्रेम हे साधन, संघटना हा पाया व प्रगती हे ध्येय'' या तीन शब्दात ऑगस्टस कॉम्टी या अर्वाचीन थोर ऋषीने मानवजातीच्या आकांक्षा संकलीत स्वरूपात मांडल्या आहेत. कॉम्टी हयाची बुध्दी एकच गोलार्धात खेळत होती. प्रगती हा शब्द मनात संशय न येता त्याने ठेवून दिला. परंतु हे ध्येय असू शकेल की काय हयाबद्दल पूर्वेकडचे विचारवंत शंका घेतील. कॉम्टीला प्रगती हे ध्येय निरपवाद सत्य वाटले. पूर्वेकडे या बाबतीत कोणाला संशय वाटेल ही गोष्ट त्याच्या मनातही आली नाही. अधिभौतिक संस्कृतीचा हा पुण्यात्मक मोह आहे, ज्या काळात सुखविलास, वासनातृप्ती हे ध्येय  होऊ पाहत आहे, तेच ध्येय समजूत मानव; विचारवंत मानव; वागत आहे, अशा वेळेस सेवा, दुसर्‍यांचे दु:ख दूर करणे हे ध्येय म्हणून मांडणे योग्य आहे. मानव जातीची सेवा हे जीवनाचे ध्येय असणे भव्य व  सुंदर वाटते खरे परंतु

पौर्वात्य देशाची निष्ठुर व कटोर अशी विवेचक बुध्दी पुढे येऊन  विचारते, ''काय हो सेवा हे जर ध्येय धरले तर मानवजातीला सदैव सेवेची  अपेक्षा राहणार हे उघड आहे. म्हणजेच मानवजात सदैव दुबळी राहणार असे नाही का होत? मानवजातीचा दुबळेपणा का आपणास चिरंजीव   करावयाचा आहे? आईबापांना सेवाचा आनंद मिळावा म्हणून मुलाने सदैव पंगू राहवे काय? मुलाला सेवेची जरुर राहणार नाही. तो आपल्या पायावर उभा आहे. हयात खरा आनंद नाही का? मला सेवेचा सदैव आनंद हवा असेल तर जगात सदैव दु:ख व दैन्यही पण असली पाहिजेत. सेवा हे अंतिम ध्येय असू शकणार नाही. आत्म्याची अनंतरूपाने प्रकट होण्याची  अनंत शक्ती यांना संस्कृती कितीही वाढली तरी ती तृप्त करू शकेल का? मानव जातीचे सेवा हे साधन आहे. व साध्याची प्राप्ती प्रत्येकाच्या अनुभवावर अवलंबून राहील, सर्व ठिकाणी परमेश्वर पाहणे हे साध्य आहे. सेवेने हे  साध्य प्राप्त होईल हे खरे. सामाजिक सुधारणा, प्रगती हया गोष्टी चांगल्या आहेत. परंतु ही अंतिम साध्ये नव्हेत. हयांचा अर्थ सेवेला महत्व नाही असा नव्हे. आजच्या आपल्या जीवनाला सेवा हे ध्येय योग्य आहे व तेच एक  ध्येय सद्य:परिस्थतीत सर्वांनी मानले पाहिजे. 

ज्यांना हया जगाच्या पलीकडील तत्त्वांचे अंधूकही दर्शन झाले नाही.  त्यांना समाजाची, मानवजातीची सुधारणा हेच ध्येय शोभते. परंतु हे जग म्हणजे आत्म्यांची पाठशाळा आहे. हया शाळेच्या बाहेर अनंत जीवन आहे ही गोष्ट खरी. परंतु शाळेच्या बाहेरील जीवनात त्यालाच उत्कृष्ट जगता येईल, जो शाळेत असताना शाळेच्या जीवनात उत्कृष्ट काम करीत असत शाळेच्या सर्व जीवनात; खेळात, डावात त्याचप्रमाणे, गंभीर गोष्टीत  तन; मन; धन ओतीत असे. आत्मा रंगवीत असे, तोच शाळेच्या बाहेर गेल्यावर तेथेही उत्कृष्टपणेच वागेल व आदर्शभूत होईल. जो इहलोकात चांगला वागेल त्यालाच परलोकाची मजा जो. हया मर्यादित जगात नीट खेळला तोच अनंत जीवनातील खेळात खेळाडू म्हणून शोभेल. जग रलोकाची शाळा आहे, गृहस्थाश्रम ही संन्याशाची शाळा आहे. जो गृहस्थ स्वैर व स्वच्छंद वागतो, तो खरा संन्यासी होऊ शकेल.

शिवाय हया जगात कायमची कोणाची प्रगती झाली असे इतिहास सांगत नाही. भरती-अहोटी हा या जगाचा कायदा आहे. रिते भरतात भरलेली रिकामी होतात. चढलेली पडतात व पडलेले चढतात. एसे हे जग आहे. आज पाश्चिमात्त्य राष्ट्रात एकीकडे संपत्तीत लोळणारे कुबेर आहेत ते दुसरीकडे दारिद्रयाने पिडलेले. रोगांनी पछाडलेल, ज्ञानहिन व अन्नान्न असे मजूरही पडलेले आहेत. युरोपचा उदय झाला आहे. परंतु अशियाचा अस्त झाला आहे. एकाचा अस्त तो दुसर्‍याचा उदय. एका बाजूला सुख दिसते.  त्याच्या दुसर्‍या बाजूला तितकेच दु:ख दिसते. कोणाचा तरी नफा  दुसर्‍या कोणाचा तरी तोटा आणि हयासाठीच प्लासीसारख्या मग लढाया होतात. चिरंतन प्रगती हया जगात नाही. प्रगतीचा लंबक सारखा पुढेमागे होत आहे. युरोपचा उदय सारखा टिकणार नाही. आशिया कायमचा पडून  राहणार नाही. एक अंधारात असेल तेव्हाच दुसरा प्रकाशात शोभणार  विरोधानेच सारे खुलून दिसत! पडणार्‍यांनी फिरून चढले पाहिजे. पतनातून अभ्युदयाकडे गेले पाहिजे.