Get it on Google Play
Download on the App Store

सत्य केव्हा तरी बाहेर येतेच 1

युरोपातील एका शहरात फार प्राचीन काळी ही गोष्ट घडली. त्या शहराचे नावमात्र मला आता आठवत नाही. या शहरात न्यायदेवतेचा एक भला मोठा पंचरसी धातूचा एक पुतळा होता. भरचौकात तो उभारलेला होता. त्या पुतळयाच्या डाव्या हातात एक तराजू होता व उजव्या हातात तलवार होती. या शहरात कोणत्याही गोष्टीचा निकाल नीट तोलून पाहून देण्यात येतो. त्यात रेसभरही चूकभूल होत नाही हे दर्शविण्यासाठी तो तराजू होता; आणि अन्यायाचे निर्दालन करण्यात येते हे दाखविण्यासाठी ती तलवार होती.

पुढे काही वर्षे लोटली. त्या शहरात पूर्वीचा न्याय राहिला नाही. अन्याय व अनीती यांचे राज्य सुरू झाले. सद्गुणास शिक्षा व दुर्गुणास बक्षीस असा अस्मानी सुलतानी व्यवहार सुरू झाला. तो न्यायदेवतेचा दगडी पुतळा जरी तेथे होता, तरी प्रत्यक्ष व्यवहारात रोज न्यायदेवतेचा खून होत होता; बळी तो कान पिळी हा नियम आता झाला होता. त्या राज्यात दुर्बलांचा वाली कोणी राहिला नाही. दुष्ट व राक्षसी लोक वाटेल तसा जुलूम करू लागले. सर्वत्र कहर गुदरला.

या पुतळयात हातात तराजू होता, तो केवढा थोरला होता. या तराजूत पक्ष्यांनी आपली घरटी केली; त्या पाखरांना त्या पुतळयाच्या हातातील तलवारीचे मुळीच भय वाटत नसे. सकाळ झाली म्हणजे या तराजूतील घरटयातून पाखरे भुरभूर उडून जात, सायंकाळ झाली, म्हणजे चिंव चिंव करीत परत घरटयात येत. पक्ष्यांची वसाहतच तेथे बसली म्हणा ना!

अशी परिस्थिती असता एका मोठया उमरावाच्या घरी एक मौल्यवान मोत्यांचा कंठा हरवला. त्या उमरावाच्या घरी एक मोलकरीण काम करण्यास होती. तिला जगात कोणी नव्हते. ना आई, ना बाप. त्या पोरक्या पोरीवर तो मोत्याचा कंठा चोरल्याचा आळ आला. त्या पोरीची चौकशी झाली व ती दोषी ठरली. गरीब बिचारी मुलगी! तिला त्या माणिक-मोत्याचे काय करावयाचे होते! परंतु न्यायदेवता त्या वेळेस त्या शहरात आंधळी झालेली होती.

 

अमोल गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
गुणांचा गौरव 1 गुणांचा गौरव 2 गुणांचा गौरव 3 गुणांचा गौरव 4 राजा शुद्धमती 1 राजा शुद्धमती 2 राजा शुद्धमती 3 राजा शुद्धमती 4 मातेची आशा 1 मातेची आशा 2 किसन 1 किसन 2 किसन 3 किसन 4 किसन 5 किसन 6 किसन 7 स्वतंत्रतादेवीची कहाणी 1 स्वतंत्रतादेवीची कहाणी 2 स्वतंत्रतादेवीची कहाणी 3 स्वतंत्रतादेवीची कहाणी 4 स्वतंत्रतादेवीची कहाणी 5 स्वतंत्रतादेवीची कहाणी 6 अब्बूखाँकी बकरी 1 अब्बूखाँकी बकरी 2 अब्बूखाँकी बकरी 3 अब्बूखाँकी बकरी 4 अब्बूखाँकी बकरी 5 आई, मी तुला आवडेन का? 1 आई, मी तुला आवडेन का? 2 आई, मी तुला आवडेन का? 3 राम-रहीम 1 राम-रहीम 2 राम-रहीम 3 राम-रहीम 4 राम-रहीम 5 राम-रहीम 6 राम-रहीम 7 राम-रहीम 8 समाजाचे प्राण 1 समाजाचे प्राण 2 तरी आईच! 1 खरा सुगंध 1 सत्य केव्हा तरी बाहेर येतेच 1 सत्य केव्हा तरी बाहेर येतेच 2 बुद्ध आणि बेटा 1 'मुलांनो, सावध!' 1 पहिले पुस्तक 1 योग्य इलाज 1 चित्रकार टॅव्हर्निअर 1 मरीआईची कहाणी 1 मरीआईची कहाणी 2 कृतज्ञता 1 श्रेष्ठ बळ 1 चतुर राजा 1 सभाधीटपणा 1