Get it on Google Play
Download on the App Store

अतिरेक

Pediatrics(लहान मुलांचा विभाग) मध्ये पोस्टेड असतानाचा हा किस्सा आहे. त्या दिवशी माझी नाईट ड्यूटी होती. रात्री १० ते १ पर्यंत भरपूर पेशंट येऊन गेले होते. मी खूप थकलो होतो. रात्री १ वाजता मी झोपी गेलो मला पटकन झोप लागली, १/२ तासात फोन आला पलीकडून साउथ इंडिअन आवाज आला “सर पेशंट आया है”. मी उठलो आणि बघायला गेलो, एक गोरागुमटा माणूस तिच्या ३-4 वर्षाच्या लहान मुलीला घेऊन उभा होता, ती मुलगी पण गोरीपान, देखणी आणि शांतपणे त्याच्या खांद्यावर झोपली होती. मी त्याला विचारले काय झालं? तो म्हणाला “डॉक्टर हि ना २ वेळा शिंकली, कधी ती अस शिंकत नाही हो, तिला सर्दी झालीये का बघा, निमोनिया तर नसेल ना?” मला प्रचंड राग आला, फक्त शिंकली म्हणून हा रात्रीच्या या वेळी घेऊन आला आणि माझी झोप खराब केली, आता त्या पोरीने शिंकू पण नये का? सकाळी उठून आला असता तर काही बिघडले असते का? वगैरे विचार माझ्या मनात आले. मनावर आणि रागावर ताबा ठेवत मी त्याला विचारले, एक दोन दिवस ती आजारी होती का, तर तो “ठणठणीत होती हो तासापूर्वी पण झोपेत २ वेळा शिंकली”. मी तिला तपासलं तिला काही झालं नव्हतं. मी त्याला म्हणालो ती व्यवस्थित आहे तिला काही झाल नाहीये ती व्यवस्थित आहे असा शिंकण नॉर्मल असू शकत. तो “अहो तिला आजाराची सुरुवात तर नसेल, तुम्ही तिला चांगले अँटीबायोटिक्स द्या. मी थोडा दटावूनच म्हणालो “अहो काही झाल नाहिये तिला कशाला विनाकारण औषधांचा मारा करायचा तिच्यावर.” सिस्टर ला सांगितलं बिल दे आणि पाठवून दे. मी परत झोपायला गेलो, १० मिनिटांनी सिस्टर चा परत फोन कि ते अजून गेले नाहीयेत. मी परत त्याला भेटलो, तो माझ्याशी भांडायला लागला “माझी मुलगी आजारी असताना तुम्हाला झोपावं कस वाटत, तुम्ही काही टेस्ट सांगितल्या नाहीत कि औषधं दिली नाहीत, तुम्ही तुमच्या सिनियर ला बोलवा.” मी माझ्या सिनियरला बोलावलं आणि त्याला सर्व सांगितलं. त्याने तपासलं आणि म्हणाला तसं घाबरण्यासारख काही नाहीये, तो परत काही टेस्ट करायच्या का, मग मात्र सिनियर ने त्याला नाईलाजास्तव एक्सरे काढायला सांगितला आणि ते बघून म्हणाला “एक्सरे नॉर्मल आहे घाबरण्यासारख काही नाहीये. मी एक औषध लिहून देतो ते २-३ दिवस द्या.” त्याने एक टोनिकचं नाव खरडलं आणि त्याला दिलं. तो बाप खुश होऊन निघून गेला. त्यानंतर सिनियर बोलला “बिचारी मुलगी माझी इच्छा नसताना केवळ तिच्या बापाच्या हट्टापायी तिला एक्सरे ला सामोर जाव लागलं.” आणि तो झोपायला गेला. मला असा प्रश्न पडला कि याच्या(मुलीच्या बापाच्या) अश्या सवयीमुळे त्याला डॉक्टर्स तपासण्या सांगतात कि हल्ली अति तपासण्या करण्याच्या पद्धतीमुळे त्याला अशी सवय लागली. असो पण एवढ मात्र होत कि हा अतिरेक होता.