Get it on Google Play
Download on the App Store

डॉक्टर

घरी मेहुणा आणि सासरे आले होते, गप्पागोष्टी मध्ये डॉक्टरची लाईफ हा विषय निघाला, डॉक्टरला पर्सनल लाईफ कमी असते, मरमर काम कराव लागत आणि डॉक्टर भावनाशुन्य आणि अरसिक असतो असं माझ्या मेहुण्याच मत होतं. मी त्याला थोडा विरोध केला म्हणालो गिरीश ओक, श्रीराम लागू, हे सर्व डॉक्टर आहेतच पण ते नावजलेले अॅक्टर पण आहेत मग तू अरसिक कस काय म्हणू शकतो वगैरे वगैरे. त्या विषयावर फार काही चर्चा झाली नाही पण माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला कि जे वैद्यकीय शास्त्राशी निगडीत नाहीत अशा लोकांच्या मध्ये डॉक्टर बद्दल काय संकल्पना असाव्यात? डॉक्टरांना त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल काय वाटत असाव? आदर्श डॉक्टर कसा असावा याच बऱ्याच ठिकाणी वर्णन केलय आणि आम्हाला आमच्या गुरूंकडून बऱ्याचदा सांगण्यात येत. डॉक्टर नेहमी निट-नेटका असावा, त्याला/तिला वैद्यकीय ज्ञान असाव व त्याने/तिने त्याचे/तिचे ज्ञान काळाप्रमाणे अपडेट ठेवावे, पेशंटशी बोलताना त्याने/तिने सौम्य भाषा वापरावी, तो/ती चारित्र्यवान असावा/असावी. असे काही ठळक मुद्दे आहेत. बरेच जण या मुद्यांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतात. डॉक्टरांचं मुख्य काम असत ते आजारचे निदान करणे आणि त्याच्यावर उपचार करणे. वैद्यकीय शास्त्रात निदान करण्यावर खूप भर दिला जातो कारण बहुतांश उपचारामध्ये फारसा बदल होत नाही आणि योग्य निदान केल्यास पटकन उपचारही करता येते. आणखी एक महत्वाच काम असतं ते म्हणजे आजाराच प्रोग्नोसीस करणे म्हणजे आजार बरा होणार आहे कि बळकावत जाणार आहे, त्या पासून जीवाला धोका आहे कि नाही, बरा होण्यास किती काळ लागेल वगैरे. हे अत्यंत अवघड काम असतं कारण कोणती व्यक्ती/आजार कसा/कशी रियाक्ट करेल हे अनिश्चित असतं. या व्यतिरिक्त डॉक्टर ला पेशंटचं आणि नातेवाईकांच सांत्वन कराव लागत. काही कठोर निर्णयही घ्यायला लागतात. हे सर्व करायला डॉक्टरला स्वतःला भावनाशुन्य रहाव लागत पण तो शेवटी एक माणूसच आहे त्यामुळे मी असा म्हणतो कि त्याला स्वतःच्या भावनेवर्ती नियंत्रण ठेवावे लागते. बहुतांश डॉक्टर हे करत असतात, असं करताना बऱ्याच वेळा असा वाटता कि डॉक्टर मंडळी हे भावनाशुन्य व अरसिक असतात पण असं नसतं. त्याने/तिने बरेच दुखी चेहरे बघितलेले असतात, प्रत्यक्षात मृत्यूला बघितलेलं असतं, जीवनातले कटुसत्य त्याने जवळून बघितलेलं असत आणि त्याने/तिने हे सत्य स्वीकारलेलं असतं. बऱ्याच डॉक्टरांना मी त्यांचे छंद जोपासताना पाहिलं आहे, कुणी चित्रकलेत आवड असते, कुणी पहाटे ४ ला उठून सतार वाजवतं, कुणी उठून जंगलात फोटो काढायला जातं, काही जण बायकामुलांना घेऊन फिरायला जातात, काही सिनेमा नाटक बघतात तर काही त्यात कामही करतात, असे बरेच छंद डॉक्टरांना असतात आणि कामाच्या व्यापातून ते ह्यासाठी वेळ काढतात. सलग ७२-७२ तास काम करण्याची क्षमता कित्येक डॉक्टरांमध्ये असते. कस काय ही लोक तहानभूक विसरून असा काम करू शकतात, खूप पैसे मिळतात म्हणून? तस नाहीये त्याच कारण अस आहे कि त्यांच्यासाठी हे फक्त काम नसतं ते त्याचं एक PASSION असत, एखादा व्यक्ती आपल्यामुळे बरा होतोय, त्याच दुखण आपण कमी करतोय हि भावना, तो आनंद त्याला काम करण्यास प्रवृत्त करते आणि त्याच्या रुग्णांनी दिलेल्या अशिर्वादामधून त्याला काम करण्याची ताकद येत असते. एखाद्या गणिताचे कोडे सुटल्यावर जसा आनंद होतो तसा एका पेशंटच्या आजाराचे निदान झाल्यावर डॉक्टरला आनंद होतो. तो आनंद मी कित्येकदा आमच्या सरांच्या चेहऱ्यावर बघितलाय, जर का कोड सुटलं नाही तर अस्वस्थता पण बघितालीये. खासगी आयुष्य डॉक्टरांना कमी मिळते हे थोड खरं आहे, इतर प्रोफेशनच्या व्यक्तींपेक्षा डॉक्टरांना सुट्टी कमी मिळते हेही खर आहे पण जी मिळते ती सुट्टी पूर्णपणे डॉक्टर आनंदाने लुटतो, जितकं शक्य असेल तितकं तो कुटुंबियांना वेळ द्यायचा प्रयत्न करत असतो. मी विचार केला कि इतर लोकांना किती वेळ मिळतो उदा; एखादा आय टी चा माणूस घ्या, तो आपल्या आपली गाडी किंवा कंपनीची गाडीतून २५-३० किमी रोज प्रवास करत कंपनीत जातो ८-१० तास काम करतो, जाण्या येण्यात आणि कामात दिवसाचे १२-१५ तास जातात, घरी आल्यानंतर तो किती वेळ देतो २-३ तास फार फार तर, उरलेल्या वेळात जेवणे, झोपणे आणि त्याचे प्रोजेक्ट चे काम सुरूच असते, कधी ओवर टाइम, तर कधी प्रोजेक्ट निमित्त प्रवास ह्या गोष्टी सुरूच असतात. असच डॉक्टरांचं असतं. एक मात्र खर आहे कुठलही काम करताना त्या कामाची आवड लागते, डॉक्टरकी साठी तर ती अत्यंत गरजेची आहे. या प्रोफेशन मध्ये पैसे तर चिक्कार मिळतात पण त्या सोबत दुसऱ्याच दुखः कमी केल्याच समाधान ही मिळतं. या प्रोफेशन चा मी एक भाग आहे याचं मला समाधान आणि अभिमान आहे.